संकट काळात रूग्णांना सेवा देणारे वाटूरचे आरोग्य केंद्र पडले खितपत: अझर शेख

.

संकट काळात रूग्णांना सेवा देणारे वाटूरचे आरोग्य केंद्र पडले खितपत: अझर शेख.

 

संकट काळात रूग्णांना सेवा देणारे वाटूरचे आरोग्य केंद्र पडले खितपत:अझर शेख

 

वाटूर: परतूर तालुक्यातील ३० ते ३५ गाव खेड्यातील गरीब रूग्णांना आणि नांदेड- जालना महामार्गावरील अपघात ग्रस्त व्यक्तींना संकटाच्या काळात आरोग्य सेवा देणारे वाटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. रूग्णालयाच्या इमारतीबरोबरच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दयनीय अवस्था झाली असून, महत्वाची पदे भरण्यात आलेली नाही. तरीदेखील येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहे.  

 

वाटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नांदेड- जालना महामार्गाला लागुन आहे. सन १९८९ साली हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. दररोज या ठिकाणी चाळीस ते पन्नास रूग्ण लहान मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी येतात. वाटूर येथे भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी ही संख्या शंभरवर जाते. आरोग्य केंद्रात २५ बेड आहेत. या शिवाय आरोग्य केंद्रात गर्भवतींची प्रसुती आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येतात. या आरोग्य केंद्राअंतर्गत यदालापूर, आंबा व रोहिणा ही तीन आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. अत्यावस्थ रूग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही या केंद्रात आहेत. सध्या आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने जीर्ण झाली आहे. त्यामुळे रूग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका दरवाजा कुजल आहेत ..दवखण्यात प्रत्येक रूम ला खिडकीचे काच फुटली आहे..पावसाळ्यात पुन पाणी स्टोर रूम ओपीडी रूम गळत असल्यास सर्व औषधी मेडीसिन भिजून खराब होतात .. निर्माण झाला आहे. रूग्णालय परिसरात विषारी साप, विंचू यांचाही वावर दिसून येतो. गेल्या अनेक वर्षापासून रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यात न आल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहेत. सध्या एक आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सहाय्यिका, ३ आरोग्य सेविका, ४ आरोग्य सेवक, ३ समुदाय आरोग्य अधिकारी, २ परिचर आणि १ औषध निर्माण अधिकारी आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्य सेवा देत आहे. महामार्गालगत असल्याने संवेदनशिल आहे. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. 

 

कोट

 

आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी २४ तास सेवा देतात. आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून, तसेच निवासस्थाने मोडकळीस आले आहेत. कर्मचारी संख्याही कमी आहे. वाटूरकरांना चांगली सेवा मिळण्यासाठी या समस्या सोडवणे गरजेचे आहे.  ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठवला आहे.  

 

बद्रीनारायण खवणे, उपसरपंच वाटूर