जालना जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारी; वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता

.जालना जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारी; वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता.

 

मुंबईच्या कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र यांनी दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यात आज (5 जुलै) रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची आणि ताशी 30-40 किमी. प्र. ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, 6 ते 8 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईच्या कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र यांनी जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले असून, काही सूचना देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.