जूना जालना येथील रहिवासी मिस्बाह अन्वर खान हिने गरीबीवर मात करत नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन 720 पैकी 633 गुण घेत जालन्याचे नावलौकिक मिळविला

.

जूना जालना येथील रहिवासी मिस्बाह अन्वर खान हिने गरीबीवर मात करत नीट पप्रतिनिधी

मागील वर्षी शिफा फिरदौस युसुफोद्दीन आता जूना जालना येथील रहिवासी पंक्चर बनवणा-याची मुलगी मिस्बाह अन्वर खान हिने गरीबीवर मात करत नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन 720 पैकी 633 गुण घेत जालन्याचे नावलौकिक मिळविला आहे. उर्दु हायस्कूलची हि विद्यार्थीनीने शिफानंतर परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही तास अगोदर ऑनलाईन नीटचा निकाल जाहीर झाला. गरीबीवर मात करत मिस्बाहने हे यश संपादन केले. शी बोलताना मिस्बाहने सांगितले कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना रात्र दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. एमबीबीएस डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. डॉक्टर बणून गरीबांची सेवा करायची आहे. उर्दु हायस्कूलचे प्राचार्य इफ्तेखार सर व शिक्षकांनी आणि अंकुश सरांनी नीट परीक्षेत मार्गदर्शन केले. आई वडीलांनी साथ दिली. अथक परिश्रमाने दहावी परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून तर बारावी बोर्ड परीक्षेत 86 टक्के गुण मिळविले. मिस्बाहला तीन बहिणी व दोन भाऊ आहे. जूना जालना येथे वडील पंक्चरच्या दुकानात काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे अशा बिकट परिस्थितीत मुलीला उच्च शिक्षणापर्यंत पोहचवणे यशाचे गमक आहे. आजचा निकाल जाहीर होताच नातेवाईक व जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिक शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. यशानंतर मुलींनी उच्च शिक्षणात पुढे यावे असे आवाहन मिस्बाहने केले आहे. मागील वर्षी जालन्याची शिफा फिरदौस युसुफोद्दीन शेखने नीट परीक्षेत यश संपादन करुन औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएस शिक्षण घेत आहे अशाच प्रकारे मिस्बाहला एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न आता साकार होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नीट परीक्षेत यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आहे. बिकट परिस्थितीत मुलीला उच्च शिक्षणापर्यंत नेणा-या पालकांचेही अभिनंदन. गरीबीवर मात करत यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांना भविष्यात पुढील शिक्षणासाठी मदत करावी असे आवाहन करत आहे.