खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

.खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

पक्ष म्हटल्यावर चढ-उतार हे येतातच, माझ्यावर टीका करणारे अजित पवार हे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. ते अवधूत गुप्ते यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात बोलत होते. 

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. मिमिक्री करण्यावरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते काही इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत.मी माझा स्वतःचा पक्ष काढला होता, त्यामधून 13 आमदार निवडून आणले. पक्ष म्हटला की चढउतार हे येतातच. पण अजित पवार म्हणतात आता माझ्याकडे एकच आमदार आहे. अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संबंधावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खूप छान दिवस होते ते, माहित नाही मला कुणी विष कालवलं ते, किंवा कुणी नजर लावली ती. 

गेल्या चार वर्षात शिवसेनेच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या दोघांपैकी कोण शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं वाटतं असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाल की, दोघांपैकी कुणीही शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याचं वाटलं नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काही बाळासाहेबांचे स्वप्न नव्हतं. महाराष्ट्र बलशाली व्हावा हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होतं असं राज ठाकरे म्हणाले.