देवेंद्र फडणवीस अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल

.महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. नेमकं असं काय कारण असेल की, यावेळेला या दोन बड्या नेत्यांची भेट होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षबांधनीच्या कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधातही रोखठोक भूमिका मांडत आहेत.